व्रत - नियम
|
|
|
(1) व्रत करणाराने गुरुवारी सकाळी लवकर उठावे. स्नान करावे व निर्मळ अंतःकरणाने पूजा-विधी करावा. (2) दिवसभर उपवास करावा. रात्री भोजन करावे. (3) या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुस-या कोणाकडूनही पूजा-आरती करुन घ्यावी आपण उपवास करावा. (4) एकादशी, शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी. कहाणी वाचावी किंवा ऐकावी. (5) व्रत-पूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी-पाजारी बोलवावे. (6) सायंकाळी गाईची पूजा करावी. गोग्रास द्यावा. (7) उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी-वाचन झाल्यानंतर सात सूवासिनींना अथवा सात कुमारीकांना हळदी-कुंकू देऊन एकेक फळ आणि या व्रतकथेची एकेक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्याला नमस्कार करावा. नंतरज आपण भोजन करावे. (8) गुरुवारी संध्याकाळी पूजा, आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा. (9) कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ह्या व्रतास सुरुवात करुन ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे यश समीपच आहे |
![]() |