 .gif) |
- घरातील पूजेची जागा स्वच्छ करुन तिथे पाट चैारंग ठेवावा.
- त्यावर कोरे कापड अंथरुन त्यावर गव्हाची किंवा तांदऴाची रास घालावी.
- त्यावर कोरे कोपड अंथरुन त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा.
- त्यात दुर्वा, पैसा-सुपारी घालावी. कलशावर विड्याची पाच पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून वर नारळ ठेवावा.
- पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी.
- त्यासमोर विडा, खोबरे, खोरीक, बदाम, इतर फऴे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी.
- पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी. पूजा संपल्यावर आरती करावी.
- रात्री श्री लक्ष्मीला मिष्टन्नाचा नेवेद्य दाखवावा. नंतर भोजन करावे.
- शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा-विसर्जन करावे.
- कलशातील पाणी तुऴशीत ओतावे. तुळशीला हळदी-कुंकू वाहून नमस्कार करावा.
श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की, जो माझे व्रत नित्य-नेमाने करील तो सदैव सुखी राहील. त्या वचनावर विश्वास ठेवा.
|