श्रीलक्ष्मीअष्टक
|
||||
|
![]() ![]() ![]() |
|||
करुनि वंदन । सदभाव धरुन । लक्ष्मी चरण । पाव रे ।।1।। |
कमल आसन।कमल वदन । कोमल ते मन । लक्ष्मीचे।।2।। |
|||
चक्र गदा हाती।माता आदिशक्ती।प्रसन्न ती मूर्ती।जगन्माता ।।3।।
|
जगाला आधार।चालवी व्यवहार।दिव्य अलंकार।शोभती ते।।4।।
|
|||
प्रसन्न होईल।धनधान्य देईल।संकटा नेईल । दूर माझ्या ।।5।। | देवी ही प्रार्थना।सुखसमाधान कुटूंब कल्याणा । वर देई ।।6।। | |||
चित्त शुद्ध करी । दैन्य दूरी करी।निर्मळ अंतरी।ठेव सदा ।।7।। | जी चूक झाली।माय पोटी घाली।तूच आता वाली।भक्त जनां ।।8।। | |||
नित्य हे अष्टक । गातील जे लोक श्रद्धाळू भाविक । पावन ते ।।9।। |