ओवाळूं आरती जय जय लक्ष्मी माता । प्रसन्न वदने होसी तारिसी तू भक्तां ।।धृ0।। पूर्व जन्मीची व्रत पुण्याई, वैभवराणीला । गर्व धनाचा तिला, विसरली लक्ष्मीमातेला। अपमानाने शाप दिला मग, आली दारिद्रता । प्रसन्न वदने प्रसन्न होसी तारिती तू भक्तां ।।1।। व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला । दैन्य दुःख ते दूर करोनी, मन निर्मल झाले । शामबाला, दासीलाही प्रतन्न वदने । पावन हो माता ।।2।। गुरुवारी हे व्रत जे करिती नेमधर्म धरुनी । मानोकामना पूर्ण करिल ती, अघटित हो करणी । पाठक गुरुजी रमला गुण गाता गाता । प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारिसी तू भक्ता ।।3।।